तोडूनिया निघा आळसाचे दार ।
यश नाही दूर फार मग ।।
निश्चय मनात करा दृढतर ।
होईल सत्वर ध्येयपूर्ती ।।
असावा विचार विवेकाचा मनी ।
होईल मग जनी कीर्ती तुझी ।।
नम्रता असावी आपल्या मनात ।
कमी न मायेत तुम्हा भासे ।।
कर्म करा सदा सचोटीने ।
काही नुरे उणे स्वरूप म्हणे ।।
यश नाही दूर फार मग ।।
निश्चय मनात करा दृढतर ।
होईल सत्वर ध्येयपूर्ती ।।
असावा विचार विवेकाचा मनी ।
होईल मग जनी कीर्ती तुझी ।।
नम्रता असावी आपल्या मनात ।
कमी न मायेत तुम्हा भासे ।।
कर्म करा सदा सचोटीने ।
काही नुरे उणे स्वरूप म्हणे ।।