पुर्णान्नाचे ताट समोर
अज्ञ त्यासी शोधी दूरवर
मनुष्यजन्मी येऊन देखील
तैसेची झाले आमुचे आजवर
धुंद होतो जीवनी आजवर
कृपा केली तरीही मजवर
हरिभक्तीची महती समजाया
सन्मुख केले सर्व चराचर
पुण्याला मिळता उपासनेची जोड
योग जुळवितो तो विश्वंभर
अकल्पित देई तो करुणाकर
सर्वाची मग होते सुकर
जया कृपेचा भाग्यवंत हा पामर
तया चरणी नमावितो शीर
ध्यानी मनी विसावा तोची निरंतर
मागणे हेची जोडोनी दोन्ही कर.
स्वरूप खाडिलकर.
No comments:
Post a Comment