सर्वत्र पसरली लाली, ही क्षितिजातुनी निघाली
निसर्गाच्या रंगोत्सवाने, धरती पूरी न्हाली
द्विजगण हे अवतरति, गुंजन सुमधुर करती
नव्या दिनाच्या नवोत्सवाचा उत्साह प्रसरवती
गोंजारून मृदु रविकिरणे, उठवती साऱ्या जगाता
निसर्गाची लगबग घाई, नवदिनारम्भा करीता
हा उत्सव नित्य अविरत, होतो चैतन्य आणाया
हा रोज तरी नव्याने, सांगतो आशेत जगाया.
स्वरुप खाडिलकर
स्वरुप खाडिलकर
No comments:
Post a Comment