धावत जगतो आयुष्य, ध्येय गाठण्यामागे
क्षणभर घे विश्रांति, शोध सुखाचे धागे
मिळविता पैसे पुरेसे, थांबविन धावाधाव
काय पुरेसे मजला, न लागे याचा ठाव
ऐसपैस घर माझे, रोजच गोड़धोड
एकाकी असतो मी जरी, कर्तुत्व माझे अजोड
पैशाची राशि मोठी, जीवना शेवटी असे
उपभोगा न उरे मी, हां खेळ तेथेची फसे
जगलो मी भविष्य-चिंतेत, खंत भूतकाळ|ची
विसरलो वर्तमाना मी, शोधताना वाट सुखाची..
-स्वरुप खाडिलकर-
No comments:
Post a Comment