या थंड वेळी
बेधुंद सकाळी
तू मजजवळी
अजुन हवे काय
हाती तुझा हात
जन्मोजन्मीची साथ
सर्व संकटी मात
करू आपण दोघे
तुझा प्रेमळ दृष्टिक्षेप
माझ्या मनाची झेप
त्यावर तुझा आक्षेप
सर्व दृष्ट लागण्याजोगे
गुलाबी गुलाबी गाल
ओठ मादक लाल
मन करी बेताल
स्पर्शास अधीर झाले
माझ्या नावाची हाक
का ग सुटली तुझी साथ
"घड्याळी वाजले आठ
स्वरुप उठ..." आई म्हणे
-स्वरुप खाडिलकर
2010
No comments:
Post a Comment