पाडवा संक्रांत होळी राखी, दसरा असो वा दिवाळी
गोडगोड खाण्यासाठी, कारणे ही निरनिराळी
ताटभर पुरणपोळी, आवडते फार
बाधू नये म्हणून, त्यावर तुपाची धार
नारळी पौर्णिमेला, होतो नारळी भात
राखी बांधताना मात्र, काजू कतलीची साथ
गणपती बाप्पा आले, कि आनंदाला नाही पार
त्या दिवसात खातो, उकडीचे मोदक वारंवार
साखरेच्या पाकात, बेसन घाला वा रवा
दिवाळीच्या फराळात, लाडू तर हवा
तूप साखरेचा कहर, म्हणजे गोडगोड चिरोटे
खाताना हरपते भान, चाटत बसाल बोटे
खमंग गुळपोळी आणि तिळगुळ छोटे छान
New Year cake नंतर, गोड म्हणून यालाच मान
उन्हाळ्यात येता फळांचा राजा, होतो आमरस
कशातही घालून खाता, होई पदार्थ तो सरस
गोडाच्या या साखळीत, न पडावा कधी खंड
त्याच करिता योजिले आहे, आम्रखंड-श्रीखंड
याहून सुद्धा निमित्ताशिवाय, जर जर खावस वाटतंय गोड
साजूक तुपातल्या शिरयाला, आहे का कशाची जोड..
-स्वरूप खाडिलकर.
No comments:
Post a Comment